2022 साल ‘आयटी’कंपनीत काम करणाऱ्यांसाठी धोक्याचे

0

मुंबई : कोरोना, लॉकडाऊन, वर्क फॉर्म होम आणि काही दिवसात नोकरींवर पाणी फिरण्याची शक्यता आयटीएन्स ला आहे. कारण पुढच्या वर्षी म्हणजे 2022 साली भारतात आयटी कंपन्यात काम करणाऱ्या 30 लाख लोकांच्या नोकऱ्यावर गदा येण्याची शक्यता आहे. बँक ऑफ अमेरिकेने जाहीर केलेल्या एका अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतातील विप्रो, कॉग्निजंट, इन्फोसिस या सारख्या बड्या आयटी कंपन्या आहेत, त्यामधील 30 लाख नोकऱ्या जाऊ शकतात असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. ऑटोमेशनचा फटका हा भारतासह अमेरिकेलाही बसणार असून त्या देशातीलही 10 लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतातील आयटी कंपन्यांत आता जवळपास 90 लाखांहून जास्त लो स्किल कर्मचारी काम करतात.
यांत्रिकीकरणाचा वापर अर्थात ऑटोमेशनमुळे या लो स्किल कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतात आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करतात. तसेच भारतातील अनेक लोक परदेशातील आयटी क्षेत्रात काम करतात. त्यांना ऑटोमोशनच्या प्रक्रियेचा फटका बसणार आहे. या क्षेत्रात ऑटोमेशन केल्यामुळे जवळपास 100 अब्ज रुपयांची बचत होणारआहेत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचा निर्णय या कंपन्यांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

बँक ऑफ अमेरिकेच्या या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की या ऑटोमेशनचा फटका हा भारत आणि चीन या दोन देशांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. या दोन देशांच्या तुलनेत गल्फ देशांना, जपान या देशांना कमी प्रमाणात बसणार आहे.india

Leave A Reply

Your email address will not be published.