डेटिंग ऍपवरून ओळख झालेल्या तरुणाला लुबाडले

0

पिंपरी : डेटिंग ऍपवरून ओळख झालेल्या मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरुणाला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून लुटल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. तरुणीने सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

या प्रकरणी आशिषकुमार बी (30, रा. रेल नगर, कोयमबिडू, चेन्नई) यांनी फिर्याद दिली आहे. तर एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि फिर्यादी आशिषकुमार यांची बंबल या डेटिंग ऍपवरून ओळख झाली. त्यातून दोघेजण दररोज एकमेकांसोबत चॅट करू लागले. दरम्यान, महिलेने तिला कामाची गरज असल्याचे सांगून आशिषकुमार यांना चेन्नई वरून पुण्याला भेटायला बोलावले.

दोघांनी पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या एका बड्या हॉटेलमध्ये रूम बुक केली. 18 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास महिलेने आशिषकुमार यांना कोल्ड्रिंकमधून गुंगीकारक औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर आशिषकुमार यांच्या अंगावरील 90 हजारांची सोन्याची चेन, 25 हजारांची सोन्याची अंगठी, 20 हजारांचा मोबाइल फोन आणि 15 हजारांची रोख रक्कम असा एकूण एक लाख 50 हजारांचा ऐवज घेऊन ती पळून गेली. तपास वाकड पोलीस करत आहेत.

 
Leave A Reply

Your email address will not be published.