नक्षलग्रस्त, आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या पद्मश्रीच्या पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळेत चोरी
पिंपरी : नक्षलग्रस्त भागासह आदिवासियांच्या मुलांसाठी पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी स्थापन केलेल्या पुनरुस्थान समरसता गुरुकुलम याआश्रम शाळेत आणि क्रांतिवीर चापेकर विद्यालयातील वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. १६ ते २६ जुलै या दरम्यान, चिंचवडगावयेथे हा प्रकार घडला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका पुनम काशिनाथ गुजर (४०, रा. क्रांतिवीर चापेकर विद्यालय, चिंचवडगाव) यांनी याबाबत चिंचवड पोलीसठाण्यात फिर्याद दिली आहे. पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी नक्षलग्रस्त भागासह आदिवासियांच्या मुलांसाठी आश्रम शाळा चिंचवडगाव येथेसुरू केली आहे. एकल पालक किंवा दोन्ही पालक नसलेली शेकडो मुले या निवासी आश्रम शाळेत शिक्षण घेतात. गेल्या अनेकवर्षांपासून सरकारी कोणत्याही स्वरुपाचे अनुदान न घेता ही शाळा स्वत: प्रभुणे आणि नागरिकांच्या तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघपरिवाराच्या मदतीवर चालविली जाते.
शहरासह देशभरातील काही दानशूर व्यक्ती वस्तू, धान्य, कपडे आणि पैसे येथील मुलांसाठी देत असतात. यातील काही पैशांमधूनविकत घेण्यात आलेले सिलिंग फॅन, शिवणकाम साहित्य पेटी, शिलाई मशिन, कापड तसेच याच आश्रम शाळेच्या आवारात असलेल्याक्रांतिवीर चापेकर शाळेच्या प्रयोगशाळेतील काही साहित्य असे एकूण ४२ हजार ८०० रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत.
महापालिकेच्या गावडे जलतरण तलावाजवळ नदीपात्राला लागून असलेल्या भूखंडावर ही आश्रम शाळा उभी राहिली आहे. मात्र, गेल्याकाही वर्षांपासून येथील नदीवरील नियोजित उड्डाणपुलाचे काम महापालिकेच्यावतीने सुरू आहे. त्यामुळे पद्मश्री प्रभुणे यांच्या आश्रमशाळेच्या भूखंडाचे दोन भाग झाले आहेत. रस्त्याच्या कामामुळे या आश्रम शाळेची संरक्षक भिंत तुटलेली आहे. त्यामुळे याचाच फायदाघेऊन, चोरट्यांनी आश्रम शाळेत प्रवेश केल्यानंतर उघड्या दारांमधून प्रयोगशाळा आणि मुलांना स्वयंरोजगार शिकविला जाणाऱ्याशिवणकाम विभागातून साहित्य चोरून नेले आहे.
राष्ट्रपती, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदींनी या आश्रमशाळेला यापूर्वी भेट दिलेली आहे. त्यानंतरही महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून ही शाळा दुर्लक्षित राहिली आहे. शाळेचेवीजबील, पाणी पुरवठा आणि आता सुरक्षितता हे मुद्दे कायमच चर्चिले गेले आहेत. चिंचवड पोलीस या चोरीबाबत तपास करीत आहेत.