पूजा चव्हाण बाबत एक वेगळीच माहिती समोर

0

बीड : बीड येथील पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. गेली काही दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा आहे. मात्र या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. ज्या बँकेकडून कुक्कुटपालनासाठी कर्ज घेतले होते, त्या स्टेट बँकेनं पूजाला कर्जाबाबत कोणताही त्रास दिला नसल्याचा खुलासा केला आहे.

बँकेचं कर्ज असल्याने पूजा तणावात होती, बँकेकडून सतत कर्जाबाबत विचारणा होत होती. त्यामुळेच तिला चक्कर आली आणि खाली पडून तिचा मृत्यू झाला असावा, असा दावा मयत पूजा चव्हाणच्या वडील लहू चव्हाण यांनी  केला होता. मात्र बँकेतून पूजाने घेतलेल्या कर्जाबाबत कसलाही त्रास देण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

डिसेंबर 2018 मध्ये पूजाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 13 लाख 50 हजाराचे कर्ज मंजूर झाले होते. परळी येथील गांधी मार्केट मधील स्टेट बँकेने हे कर्ज दिले होते. आतापर्यंत 35 हजार 500 रुपयाप्रमाणे 12 हफ्ते पूजाने भरले आहेत. या कर्जासाठी बँकेकडून कसलीही विचारणा झाली नसल्याने बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.