नवी दिल्ली : सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये मोठे बदल होणार आहेत. सरकारच्या या आदेशामुळे नवीन मेन्यूकार्डमध्ये हॉटेल-रेस्टॉरंट मालकांना अन्नाची न्यूट्रीशन व्हॅल्यू (पोषण मूल्य) लिहावी लागणार आहे.
हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जे पदार्थ बनवले गेले त्यामध्ये किती कॅलरीज आहेत, याचीही नोंद मेन्यूकार्डमध्ये अनिवार्य आहे. कॅलरीव्यतिरिक्त हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील अन्नातील पोषक तत्त्वांचा उल्लेखही मेन्यूकार्डमध्ये करणं आवश्यक असेल.
भारत सरकारने ठरविलेल्या या नियमात सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट्स येणार नाहीत. आत्ता हा नियम फक्त त्या रेस्टॉरंट्सवर लागू होईल ज्यांच्या 10 हून अधिक साखळ्या आहेत. वास्तविक, या नियमाची मागणी बर्याच काळापासून मागणी केली जात होती जेणेकरुन लोक पैसे खर्च करुन हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेवण करतात तर त्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्नाची हमी मिळायला हवी.