अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार, पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा फोन

0

मुंबई : अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा फोन पोलीस हेल्पलाईन नंबर 112 वर आला आहे.

हा फोन कुणी केला याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. पण धमकीच्या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनला फोन करणाऱ्याने असा दावा केला आहे की, अंधेरी येथील इनफिनिटी मॉल, जूहू येथील पीव्हीआर आणि सहारा हॉटेल एअरपोर्ट येथे बॉम्बस्फोट होणार आहे.

धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सहारा एअरपोर्ट पोलीस, जूहू, अंबोली आणि बांगूर नगर पोलीस स्टेशन येथील पथक तसेच सीआयसीएफ आणि बीडीडीएस या पथकानं तपास कार्य सुरु केलं आहे. तिन्ही ठिकाणी पोलिसांनी तपास केला पण अद्याप त्या ठिकाणी कोणतीही स्फटोकं आणि संशयास्पद वस्तू मिळालेली नाही. पोलीस अद्याप याचा तपास करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन 112 वर मंगळवारी रात्री साडेदहा वाजता फोन आला होता. मुंबई पोलीस फोन करणाऱ्यांचा शोध घेत आहे. फोन करणाऱ्याबाबात अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही.

एका अज्ञात व्यक्तीनं मंगळवारी रात्री साडेदहा वाजता मुंबई पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करत मुंबईमध्ये तीन ठिकाणी बॉस्मस्फोट होणार असल्याचं सांगितलं. अंधेरी येथील इनफिनिटी मॉल, जूहू येथील पीव्हीआर आणि सहारा हॉटेल एअरपोर्ट येथे बॉम्बस्फोट होणार असल्याचे अज्ञाताने सांगितलं होतं. ही तिन्ही ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात सणासुदीचे दिवस असल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. अशातच धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून तपास कार्य वेगानं करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.