राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाहीत : जयंत पाटील

0

मुंबई: अनिल देशमुख यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहणार आहे. राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाहीत. त्यामुळे वावड्या उठवण्याची गरज नाही, असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होती. या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी गृहमंत्री बदलला जाणार नाही आणि राज्यात खातेपालट होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येणार नाही. गृहमंत्री बदलण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

गृहमंत्रीपदासाठी तुमचं आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तुमच्या नावाला हिरवा कंदीलही दाखविण्यात आला आहे, त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय? असं पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर याला हिरवा कंदील, त्याला हिरवा कंदील असं काही नाही. तुम्हीही या वावड्या उठवू नका, असं पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.