मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवारी) पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही महत्वाची बैठक पार पडली आहे.
आज 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, मुला-मुलीचं वसतिगृह तसेच अन्य नवीन निवासी इमारती बांधण्यासाठी 95.15 कोटी रुपये मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केले गेले आहे.
काय आहेत महत्वाचे निर्णय?
1 – (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) – नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा (ता.जि.नागपूर) येथे विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी.
2 – (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) – कोविड 19 पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार.
3 – (कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग) – महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय.
4 – (महसूल विभाग) – महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम- 2 (g) (iv)
आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 (da) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
5 – (पणन विभाग) – बाजार समित्या मजबूत करण्यासाठी
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा.
6 – (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) – शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी
आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप