मुंबई ः हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. मात्र, विरोधी पक्षाने सकाळपासून आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”राज्यसरकारने या अधिवेशनामध्ये १० विधेयके दाखविली आहेत. त्यांना मूळात चर्चाच करायची नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा-ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये, यासाठी हे सरकार चर्चेपासून पळ काढत आहे”, असा आरोप फडणवीस यांनी सरकारवर केला आहे.
सरकारी बंगल्याच्या खर्चावर विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, ”बंगल्याच्या नुतणीकरणाची कामे सुरू असतात. बंगल्याच्या नूतणीकरणावरील खर्च कमीत कमी पैशांत झाला पाहिजे. पण शेतकऱ्यांसुद्धा मदत करा. बंगाल्यावर खर्च करायला पैसे आहेत, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही?”, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी प्रश्नावर फडणवीसांनी सरकारवर निषाणा साधला आहे. ते म्हणाले की, ”इथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या? महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. रशिया, अमेरिकेत काय झालं ते बोलता आणि महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. तुम्ही शेतकरी बांधावर जाऊन २०-२५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. पण वास्तवात एक फुटकी कवडीसु्द्धा दिली नाही”, अशी टीका फडणवीस यांनी सरकारवर केली.