ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एवढ्या रूपयांचाच खर्च करता येणार
वाचा सविस्तर...कोणाला किती खर्च करता येणार
मुंबई : राज्यातील 1423 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच इच्छुकांच्या खर्चावर निवडणूक आयोगाने बंधन घातले आहे. उमेदवारांना २५ ते ५० हजार रुपयांपर्यतचा खर्च करता येणार आहे.
राज्यात वर्षाच्या सुरुवातीलाच १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर निकाल १८ जानेवारीला लागण णार आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीची गणिते जुळविण्याची रणनीती आखणे सुरू झाले आहे. या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून दखल घेण्याची शक्यता आहे. या ग्राम पंचायती ताब्यात मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा ठरविण्यात आली आहे. यामध्ये ७ ते ९ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत २५ हजार रुपये, ११ ते १३ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ३५ हजार रुपये
आणि १५ ते १७ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ५० हजार रुपये खर्च करता येणार आहेत.
यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होणार नसून पारंपरिक पद्धतीने म्हणजे सदस्यांमधून होणार आहे. ही निवडणूक गावापुरती मर्यादेत असली तर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या निवडणुकीत उमेदवारास २५ ते ५० हजार रुपयेपर्यंतचा खर्च करता येणार आहे. या मर्यादेपेक्षा जास्त पैसा खर्च करणाऱ्याचे सदस्यत्व धोक्यात येईल. आरक्षित वर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज केल्याची पोचपावती नामांकन पत्र दाखल करताना जोडावी लागणार आहे.