यामुळे झाले लता मंगेशकर यांचे नामकरण

0

मुंबई : स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी यास दुजोरा दिला आहे. ही दुखद बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण देशात दुखाची लाट आहे. बॉलीवुडपासून राजकीय जगतापर्यंत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये दुखाचे वातावरण आहे. गान कोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले.

पीएम नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी त्यांच्या निधनावर दुख व्यक्त केले आहे. लोक त्यांच्या जीवनाशी संबंधीत किस्से आणि आठवणी सांगत आहेत. अशावेळी त्यांच्या नावाशी संबंधीत एक न ऐकलेला किस्सा जाणून घेवूयात…

28 सप्टेंबर 1929 ला जन्मलेल्या लता मंगेशकर यांचे खरे नाव लता नव्हते. जेव्हा त्या जन्माल्या आल्या तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव हेमा ठेवले होते. काही काळानंतर त्यांच्या वडिलांचे प्रसिद्ध नाटक ’भाव बंधन’च्या प्रसिद्ध कलाकार लतिका यांच्या नावावरून त्यांचे नाव लता ठेवण्यात आले. लता मंगेशकर आपल्या आई-वडिलांचे पहिले अपत्य होत्या. त्यांच्यानंतर कुटुंबात मीना, आशा भोसले, उषा आणि एकुलता एक भाऊ हृदयनाथ यांचा जन्म झाला.

सुरांची देवता लता मंगेशकर प्रसिद्ध थिएटर अभिनेते पंडित दीनानाथ मंगेशकर आणि शास्त्रीय गायिका शेवंता (शुदामती) यांच्या कन्या होत्या. लतादीदींची आई शेवंता त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या दुसर्‍या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नर्मदा होते. त्यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ यांनी सन 1927 मध्ये शेवंता यांच्याशी विवाह केला होता.

लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबाला जवळून ओळखणारे सांगतात की त्या पाच वर्षाच्या वयापर्यंत आपल्या वडिलांसमोर गाणे गात नसत. एक दिवस अचानक त्यांच्या वडिलांनी त्यांना गाताना आणि गुणगुणताना ऐकले आणि ते हैराण झाले.
मुलीच्या गायनाने आणि सुरांनी मंत्रमुग्ध झालेल्या वडिलांनी त्याच दिवशी ठरवले की, लताला गाणे शिकवायचे.

आश्चर्यकारक हे आहे की लता मंगेशकर आपल्या जीवनात केवळ दोनच दिवस शाळेत जाऊ शकल्या. संगीताच्या शिक्षणासोबत वेगवेगळ्या भाषांचे शिक्षण त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच दिले. बॉलिवुडच्या जाणकारांनुसार, 16 डिसेंबर, 1941 ला लता मंगेशकर पहिल्यांदा स्टुडिओमध्ये माईक समोर आल्या होत्या. एका रेडिओ कार्यक्रमासाठी त्यांचे गाणे रेकॉर्ड झाले आणि अशाप्रकारे सुरू झाला त्यांचा 8 दशकांचा संगीतमय आणि सदाबहार प्रवास जो आज त्यांच्या शेवटच्या श्वासानंतर संपला.

Leave A Reply

Your email address will not be published.