घर खरेदी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप फायदेशीर

वाचा सविस्तर...

0

नवी दिल्ली : घर खरेदी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप फायदेशीर मानला जात आहे. कारण बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहे. मात्र ही सवलत 31 मार्चपर्यंतच मिळणार असल्यानं ग्राहकांनी वेळीच निर्णय घेणं आवश्यक आहे.

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. भारतीय स्टेट बँकेनं गृहकर्जाचे व्याजदर 70 आधारभूत अंकांनी स्वस्त केले आहेत. म्हणजेच गृहकर्जाचे व्याजदर आधीच्या दरापेक्षा 0.7 टक्क्यानं घटवले आहेत. त्यामुळं बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर 6.70 टक्के झाला आहे. स्टेट बँकेनंही ही सवलतीचा व्याजदर 31 मार्च पर्यंतच मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे.

त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेनं एक मार्चपासून आपले गृहकर्जाचे व्याजदर 10 आधारभूत अंकांनी कमी केले असून, त्यांचा व्याजदर हा आता 6.65 टक्के आहे. हा व्याजदर देशात सर्वात कमी असल्याचा दावा बँकेनं केला आहे. व्याजदरातील ही सवलत फक्त 31 मार्चपर्यंत मिळणार असून, कर्ज घेणाऱ्यांचा क्रेडीट स्कोअर आणि लोन टू व्हॅल्यू गुणोत्तराशी व्याजदर जोडलेले असल्याचं बँकेनं स्पष्ट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.