‘ते’ आमदार परत आमच्याकडे येतील; मात्र एकनाथ शिंदे यांना थारा नाही : संजय राऊत

0

नाशिक : आम्हीच खरी शिवसेना आहोत. या सरकारचे काही खरे नाही. ते कधीही कोसळेल. भाजपासोबत गेलेले आमदार लवकरच आमच्याकडे शिवसेनेत परत येतील. मात्र, एकनाथ शिंदे येणार नाहीत. त्यांना आम्ही घेणारही नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

एखाद्याला गाडायचे ठरवले तर मी गाडतोच. इलेक्शन कमिशनला विचारून बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नाही. जनतेने बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखपद दिले. इलेक्शन कमिशनचा बाप जरी आला तरी शिवसेना आणि धनुष्यबाण काढू शकणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी मालेगाव येथे दिला.

संजय राऊत यांच्या नाशिक व मालेगाव येथे सभा झाल्या. ते म्हणाले की, मला मालेगावला यायचेच होते. प्रकृती बरी नव्हती तरीही मी आलो. कारण मी ठरवले होते. जेव्हा मी ठरवतो की, एखाद्याला गाडायचे ठरवले तर ते मी करतोच. मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची जंगी सभा 26 तारखेला होणार आहे. तेथे पाहा की, शिवसेना काय आहे.

संजय राऊत म्हणाले, भाजपासोबत गेलेले आमदार लवकरच शिवसेनेत परत येणार आहेत. आम्हीच खरी शिवसेना आहोत. सध्याच्या सरकारचे काही खरे नाही. कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. आज एकीकडे आंदोलने सुरू आहेत, पण दुसरीकडे सरकार वेगळ्याच कामात व्यस्त आहे. आता भाजपासोबत गेलेले आमदार खऱ्या शिवसेनेत परत येणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे येणार नाहीत. त्यांना आम्ही घेणारही नाही.

संजय राऊत म्हणाले, शिवसेना गत 55 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली, त्यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हायचे नव्हते. मराठी माणसांना सन्मान, स्वाभिमानाने जगता यावे यासाठी त्यांनी शिवसेना उभारली. जनतेने बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखपद दिले. इलेक्शन कमिशनला विचारून शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली नाही. इलेक्शन कमिशनचा बाप जरी आला तरी शिवसेना आणि धनुष्यबाण काढू शकणार नाही.

संजय राऊत म्हणाले, लोक म्हणतात संजय राऊत टोकाचे बोलतात. होय मी टोकाचे बोलतो आणि बोलणारच. कारण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी तुरुंगात जावून आलो. मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलो. या पन्नास गद्दारासारखे गुढघे टेकले असते तर मी तुरुंगात गेलो नसतो. तुरुंगात अतोनात मी त्रास सहन केला.

संजय राऊत म्हणाले, तुरुंगात अतोनात मी त्रास सहन केला.तरीही मी शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही. समोर बसलेले शिवसैनिक हीच खरी शिवसेना आहे. त्यांच्यासाठी मला लढायचे आहे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे हा खूप मोठा इतिहास आहे. हा इतिहास कुणाला चोरता येणार नाही. मी एवढेच सांगेल की, यापुढचा संघर्ष कठिण, तीव्र असेल पण अंतिम विजय आपलाच आहे. या महाराष्ट्रात आणि दिल्लीत आपलेच राज्य असेल तेव्हा बघू की, ईडी आणि सीबीआय काय करते ते.

Leave A Reply

Your email address will not be published.