अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकी ! यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ, तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन; PSI वर गुन्हा दाखल; तडकाफडकी निलंबन
पुणे : आपल्या अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला शिवीगाळ करुन कमरेच्या पिस्तुलाला हात लावून जीवे ठारमारण्याची धमकी पुणे शहर पोलिस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकांनी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी प्रविण नागेश जर्दे या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रविण जर्दे हा सध्याशिवाजीनगर कोर्ट आवार येथे नियुक्तीला आहेत. कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना १९ फेब्रुवारी रोजीसकाळी १० वाजता घडली होती.
याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे याचे फिर्यादी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. तिने हे संबंध सोडूनद्यावेत, यासाठी फिर्यादी तिला सांगत होते. तिने हे प्रविण जर्दे यांना सांगितले. त्यावरुन प्रविण जर्दे त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनीफिर्यादी, त्यांची आई व मुलांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली.
यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे.
तसेच त्यांनी कमरेच्या पिस्तुलाला हात लावून तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी व त्यांच्या घरचे घाबरुन गेले होते. शेवटी त्यांनी हिंमत करुन पोलिसांकडे गेले. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआहे. दरम्यान, अप्पर आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पीएसआय जर्दे यांना पोलिस दलातून निलंबीत केले आहे.