अमित मधुकर मेश्राम (36, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याबाबत बुधवारी (दि. 23) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन गजधने उर्फ जंगली (रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन याने फिर्यादी यांना त्यांच्या फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अश्लील मेसेज केले. तसेच बदनामी करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत आरोपी सचिन याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 294, 501, 506, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2010 कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत