पुण्यातील नवले पुलावर ट्रकने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू

0

पुणे : कात्रजहून पुण्याकडे येणार्‍या नवीन सातारा – पुणे महामार्गावरील नवले पुल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनला आहे. आज सकाळी पुण्याहून सातार्‍याकडे जाणार्‍या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवले. त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबतची प्राथमिक माहिती अशी, पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने एक ट्रक जात होता. नवले पुलापासून पुढे काही अंतरावर भूमकर पुलाजवळ त्याने पुढे असलेल्या एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला काही जण थांबले होते. रस्त्याकडेला थांबलेल्यांवर ट्रक गेला. त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाला. या तरुणांच्या हातात बॅगा होत्या. ट्रकने त्यांना अक्षरश फरफटत नेले.

या अपघाताने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी पोहचत आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.