भोसरीत तीन लाख ३४ हजारांचा गुटखा जप्त

0

पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाईचा धडाकाच सुरु आहे. यामध्ये सध्या पोलिसांनी गुटखा विक्री, साठवणूक याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. भोसरी पोलिसांनी अश्याच एका गोडाऊनवर छापा टाकुन तीन लाख ३४ हजारांचा गुटखा जप्त केला.

शंकर चिमनाजीराव गणेशकर (४१, रा. शांतीनगर, भोसरी), सोवरन रामकुमार प्रजापती (२१, रा. मेदनकरवाडी, चाकण, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सुमित देवकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला सुपारी, विमल पान मसाला तंबाखू, टोबॅको, प्रियमय निवास सुगंधित पान मसाला, जाफरानीजर्दा, सागर पान मसाला, महक पान मसाला, राजश्री पान मसाला या प्रकारचा गुटखा आरोपींनी देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत येथे एका खोलीत साठवून ठेवला होता. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती मिळाली. भोसरी पोलिसांनी गोडाऊनवर छापा मारून तीन लाख ३४ हजार ३८५ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.