पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी तर्फे पोलीस आयुक्तालयाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त तीन मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन देण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरीक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांच्याकडे या व्हॅनचे हस्तांतरण करण्यात आले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, उपमहापौर केशव घोळवे, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, संचालक सचिन चिखले, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, विजय बोरुडे उपस्थित होते.
पीटीझेड कॅमेरा, व्हेईकल एचडी कॅमेरा, 8 पोर्टेबल वायरलेस कॅमेरा, 2 ऑपरेटर, व्हिडिओ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर 12, एसी आणि जनरेटर सेट, एक आठवठ्याची व्हिडीओ साठविण्याची क्षमता, 1 लॅपटॉप, 55 इंची एलईडी टिव्ही, मिटिंग रुम, वाहनांसाठी एलईडी लाईटस्, चार स्पिकर व सायरन, दंगल प्रतिबंधक उपकरणे, युपीएस, स्ट्रेचर, फ्रस्टेड बॉक्स आणि फायर एक्स्टेंग्चर अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा असलेली व्हॅन पोलीस दलासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.