पुणे : विना परवाना पोपट आणि लव्हबर्डस् पिंजऱ्यात ठेवून त्यांच्या विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या एकास पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख 3 हजार रुपयांचे तीन पहाडी पोपट आणि 123 बजरी जातीचे लव्हबर्ड जप्त केले आहेत.
रहेमतुल्ला शौकिउल्ला खान याला अटक केली आहे. रस्ता पेठेतील पेंशनवाला मशिदीसमोरील एका इमारतीच्या गच्चीवर एकाने तीन पहाडी पोपट आणि 123 लव्ह बर्डस् कोंडुन ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलीसांनी वनरक्षक काळूराम कोंडीबा कड यांच्या मदतीने पोलीसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या छाप्याच्या वेळी पोलीसांना हे पक्षी एका पिंजऱ्यात असल्याचे दिसले. त्यांची कोणत्याही प्रकारची जीवीताची काऴजी घेतली नव्हती. तसेच कोणताही परवाना घेतला नसल्याचेही स्पष्ट झाले. या पक्षांची अंदाजे किंमत दोन लाख तीन हजार इतकी आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत कित्येक अधिक आहे.
पोलिसांनी रहेमतुल्ला शौकिउल्ला खान याला अटक केली असून हे पक्षी त्याने कोठून आणले आणि तो कोणाला विकणार होता याची माहिती पोलिस घेत आहेत. तसेच या गुन्ह्यात आणखी कोण सहभागी आहे किंवा कोणती आंतरराज्य टोळी यामध्ये आहे का याचाही शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.