पिंपरी : हिंजवडी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये तीन आरोपींना तीन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुसासहअटक केली आहे. हि कारवाई हिंजवडी फेज दोन व तीन येथे बुधवारी (दि.14) करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत पोलीसांना बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, हिंजवडी फेज सर्कल दोन येथे अक इसम गावठी कट्टा विक्रीसाठीघेऊन आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हॉटेल इराणी कॅफे येथून प्रेम महेश जगताप (वय 19 रा. सिंहगड रोड, वडगाव) याला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुस असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.
तर दुसऱ्या कारवाईत पोलिसांना हिंजवडी फेज सर्कल तीन येथे एक इसम शस्त्र घेऊन फिऱत असल्याची बातमी मिळाली, पोलीसघटनास्थळी गेले असता हिंजवडी फेज 3 य़ेथील बसस्टॉपजवळ दोघा संशीयांतान ताब्यात घेतले. ऋषिकेश सुभाष ओझरकर (25 रा. मुळशी), रोशन दशरथ तेलंग (21 रा.मुळशी) यांना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी 70 हजार रुपयांचे दोन गावठी कट्टे जप्तकेले आहेत.
तीनही आरोपी विरोधात विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकऱणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हिंजवडी पोलीस हिशस्त्रे कोठून आली कोणाला विकली जाणार होती याचा तपास करत आहेत.
हि कारवाई सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्याबापू देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकाटे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, कैलास केंगले, अरूण नरळे, रितेशकोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, नरेश बलसाने, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सुभाष गुरव, सागरपंडित यांनी केली आहे.