आजारपणाचे सोंग आणणारे तीन पोलीस निलंबीत

0

पिंपरी : आजारी असल्याचे सांगून फोर्स वनच्या प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तीन पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

पिंपरी आयुक्तालयात दहशतवादविरोधी पथक निर्माण करण्यात यामुळे थोडा अडथळा आला आहे. या विशेष पथकासाठी या पाच तरुण पोलिसांची निवड प्रशिक्षणाकरिता झाली होती. मात्र,त्यातील चौघांनी त्याला दांडी मारल्याने या पथक निर्मितीला काहीसा ब्रेक लागला आहे. या प्रशिक्षणाला जावे लागू नये म्हणून निलंबित तिन्ही पोलिसांनी एकदम ‘सिक रिपोर्ट’ केला. म्हणजे त्यांनी आजारी अस

ल्याचे कळविले.मात्र,त्यांचा हा खोटेपणा उघडकीस येताच त्यांच्याविरुद्ध थेट निलंबनाची कडक कारवाई करून शिस्तबध्द दलात योग्य तो संदेश दिला गेला. पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मंजुरीने पोलिस उपायुक्त (परिमंडळ दोन) आनंद भोईटे यांनी हे निलंबन केले.चौथा पोलिस हा परिमंडळ एकमधील असल्याने त्या परिमंडळाचे पोलिस उपायुक्त त्याबाबत आदेश काढणार आहेत.

विजय गायकवाड, श्रीकांत शिंदे आणि जुम्मा पठाण अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. गायकवाड व शिंदे हे वाकड, तर पठाण हे चिखली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यासह पाचजणांची निवड ही दहशतवादविरोधी पथकाच्या प्रशिक्षणासाठी झाली होती.मात्र, त्यातील फक्त एकजणच त्यासाठी हजर झाला. तर, बाकीच्यांनी दांडी मारली.

Leave A Reply

Your email address will not be published.