चिंचवडमध्ये तिरंगी लढत, कसब्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला

0

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभामतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी भाजप आणि महाविकासआघाडीकडून संपूर्ण ताकदीने प्रचार करण्यात आला. दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते या पोटनिवडणुकांसाठी पुण्यात ठाण मांडून होते. त्यामुळेकसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. यामध्ये कसब्याची लढत भाजपसाठी अधिकप्रतिष्ठेची आहे. कसब्यातील प्रचारासाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्र्यांपासून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना प्रचारातउतरवले होते. त्यामुळे आज कसबा आणि पुण्यातील मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. राजकीय पक्षांकडून कधी नव्हे इतका जोरदार प्रचार झाल्याने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील मतदानाचा टक्का कितीअसणार, याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.

* चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

*भाजपच्या अश्विनी जगताप आणि कुटूंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

*अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

*

मी १०० टक्के निवडून येणार, मी जातपात बघता काम केले, त्यामुळे मला सर्व स्तरांमधून मतदारांचा पाठिंबा: रवींद्र धंगेकर

*रविंद्र धंगेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

* चिंचवडमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. मतदारसंघामध्ये एकूण पाच लाख ६८ हजार ९५४मतदार असून, ५१० केंद्रांवर मतदान होणार आहे. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली कामासाठी ५१ पथके राखीव आहेत. तीन हजार ७०७पोलिस कर्मचारी, ७२५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप Vs मविआचे नाना काटे Vs अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात लढत

* कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध मविआचे रवींद्र धंगेकर अशी लढत

Leave A Reply

Your email address will not be published.