गौरव मचिंद्र डोंगरे (२३, रा.चाकण ता. खेड) आणि सोप्या संजय शिंदे (२९, रा. रासे ता. खेड जि. पुणे) या दोघाना अटक केली आहे.
गुन्हे शाखा, युनिट 3 चे पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले व अमलदार हे शिवजयंती निमित्त चाकण येथे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी डोंगरे हा चाकण येथे लोकांना शिवीगाळ करून हातामध्ये पिस्टल घेऊन दहशत करीत आहे अशी माहिती चामले यांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन त्याला पिस्तुल सह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी करून त्याचा साथीदार तडीपार स्वप्निल उर्फ सोप्या टाळा ताब्यात घेतले. या दोघांकडून एकूण 03 गावठी पिस्तुल व 02 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
सोप्या संजय शिंदे हा तडीपार असून त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत तर गौरव मचिंद्र डोंगरे याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शंकर बाबर, उपनिरीक्षक चामले आणि त्यांच्या पथकाने केली आहे.