अत्याचार करुन सात वर्षाच्या मुलीचा खून करुन फरार असणारा तीन वर्षानंतर जेरबंद

0

पिंपरी : तीन वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून, लैंगिक अत्याचार करुन, खून करून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. कानपुर पोलिसांनी त्याला अटक करुन पिंपरी पोलिसांकडे दिले आहे.

राजकुमार उर्फ प्यारेलाल चंद्रप्रकाश कुरील (32, मूळ रा. वामीपुरबा, पोस्ट – बिरसिंहपूर, ता. घाटमपूर, जि. कानपुरनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजकुमार पिंपरी येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या एका सात वर्षांच्या चीमुकलीचे राजकुमार याने 24 सप्टेंबर 2018 रोजी अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्दयतेने खून केला. 27 सप्टेंबर रोजी सकाळी बाराच्या सुमारास पिंपरी मधील एच ए मैदानाच्या एका कोपऱ्यात झुडुपांमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे निष्पन्न झाले.

घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तापसचक्रे फिरवली. शहरातील मुख्य चौकातील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपी देखील निष्पन्न केला. त्यानंतर पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आली. काही पथकांनी वेषांतर करून आरोपीच्या मूळ गावी, अन्य ठिकाणी अनेक दिवस शोध घेतला. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. तरीही पोलिसांची शोध मोहीम सुरूच होती.

इकडे या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांचे काही दिवसात निधन झाले. खचलेल्या आईचा देखील काही दिवसांनी मृत्यू झाला. एका घटनेने संपूर्ण घर उध्वस्त झाले.

कानपुर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमार हा फरारी होता. कानपुर नगर मधील सर्व पोलीस ठाण्यात त्याचे पोस्टर लावण्यात आले होते. कानपुर पोलिसांनी आरोपी राजकुमार याला अटक केली. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत माहिती दिली. तात्काळ पिंपरी चिंचवड मधून चार जणांची टीम कानपुर नगर मधील साढ पोलीस ठाण्यात पोहोचली.

Leave A Reply

Your email address will not be published.