टिक टॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे द्यावा

0

बीड : राजकारणात नव्याने सक्रिय झालेल्या टिक टॉक गर्ल पूजा लहू चव्हाण आत्महत्या प्रकरणात सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एका मंत्र्यावर आरोप होत आहेत. त्यामुळे या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी वेगवेगळ्या क्षेत्रातून बीड जिल्ह्यात होत आहे.

परळी परिसरातील वसंतनगर तांड्यावरची पूजा चव्हाण. सर्वसामान्य कुटुंबातील पूजा महाविद्यालयातील शिक्षण घेत असताना सामाजिक कार्यक्रमातही  सहभागी होऊ लागली. बोलण्यात स्पष्टपणा, धडाडी यामुळे ती सामाजिक कार्यात सक्रिय झाली. तिच्याकडे असणारे महागडे मोबाईल, उच्चभ्रू राहणीमान बोलण्यातले, वागण्यातले धाडस यामुळे ही तरुणी कोण असे अनेक जण विचारायचे. अलीकडच्या काळात ती टिकटॉकमधूनही दिसायला लागली. त्यामुळे तिची चर्चा अधिकच होऊ लागली.

इंग्रजी स्पोकन क्लासेससाठी पूजा काही महिन्यांपूर्वी पुण्यात आली.  वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उच्चभ्रू सोसायटीत ती तिच्या नातेवाईक मित्रांबरोबर राहू लागली. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसापासून पूजा तणावात होती. मात्र तिने याबाबत काही बोलली नाही. ५ फेब्रुवारीला एका खासगी रुग्णालयात ती दाखल झाली होती अशी माहितीही समोर आली आहे. त्यानंतर रविवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान,  सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई राठोड यांनी,  दोषींवर कडक कारवाई करून तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.