आजची निवडणूक सरकारला हादरा देणारी 

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटवरून साधला निशाणा 

0

पुणे ः ”राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो. ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. महाविकास आघाडीला मोठा हादरा देणारी ही निवडणूक असणार आहे”, असा आशयाचे ट्विट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील पुढे लिहितात की, ” लोकशाहीमध्ये जनतेकडे मतदान हेच एकमेव प्रभावी शस्त्र आहे. सरकारला त्यांच्या अपयशी कारभाराची जाणीव करून देतो. या निवडणुकीच्या माध्यमातून आघाडी सरकारला किती कंटळले आहेत हे समजेल. सरकारमध्ये नसूनही ज्या प्रकारचे समर्थन पदवीधर आणि शिक्षकांनी आमच्या कार्यकर्त्यांना केले, ते फारच उत्साहवर्धक आहे. या निवडणुकीमुळे सरकारच्या बहुमताला काही फरक पडत नाही. मात्र, पुढे तरी सरकार जनहितार्थ कार्य करण्याचा विचार तरी करेल”, अशा इच्छा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

आज राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदान झाले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपा एकमेकांवर टीका करताना दिसले. याच तापलेल्या राजकीय वातावरणात चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.