पिंपरी : सहायक पोलिस आयुक्त यांच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून फिरणाऱ्या तोतयास पिंपरी चिंचवडच्या वाहतूक पोलिसांनी अटक केली.
निगडी वाहतुक विभागाचे कर्मचारी जाधव हे सरकार चौक कुंदळवाडी या ठिकाणी कार्यरत होते. त्यावेळी तोतया सहायक पोलीस आयुक्त मुंबई यांस त्यांचे बनावट ओळखपत्रासह पकडण्यात आले.
ओळखपत्रावर असलेल्या फोटोमध्ये फोटोतील व्यक्तीच्या खादयांवर राजमुद्रा व स्टार असल्याचे फोटोत दिसत असल्याने ओळखपत्र बनावट असल्याने शंका आली. त्यांना जवळच्या कुंदळवाडी चौकीत नेण्यात आले व त्यांची चौकशी केली असता सदर इसमांने ओळखपत्र बनावट असल्याचे मान्य केले.
सदरची कामगिर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त ( वाहतुक शाखा ) सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांचे मार्गदर्शखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस.राउत , पोना गायकवाड , पोना दहिफळे , पोशि कशाळे, पोशि कोल्हे यांनी केली आहे .