पिंपरी : पोलीस अधिकाऱ्याचा गणवेशात उपनिरीक्षक असल्यांर आणि एसीबीआय बँकेचा गणवेशात बँकेचा मॅनेजर असल्याचे भासवून दुकान दारांकडून पैसे उकळणाऱ्या दोन तोतयांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 31) रात्री सृष्टी चौक येथे करण्यात आली.
बुद्धभूषण अशोक कांबळे (27, रा. म्हेत्रे वस्ती, टॉवर लाईन, निगडी) आणि औदुंबर भारत जाधव (29, रा. कासारवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक प्रमोद गोडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक सांगवी परिसरात मंगळवारी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सृष्टी चौकातील एका पान टपरीवर दोघेजण संशयितपणे थांबल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यातील एकाने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगितले. तर एकाने एसबीआय बँकेत क्रेडिट मॅनेजर असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात दोघेही लोकसेवक नाहीत.
आरोपींची तोतयागिरी पोलिसांनी उघडी पाडून त्यांना ताब्यात घेतले. एकाने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान केला होता. तर दुस-याने एसबीआय बँकेचा ड्रेस कोड परिधान केला होता. दोघे आरोपी सार्वजनिक ठिकाणी जाऊन दुकानदारांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे मागत होते. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक येडे तपास करीत आहेत.