व्यापाऱ्यांनी संयम ठेवून सहकार्य करावे : सचिन भोसले

0
पिंपरी : संपुर्ण राज्यात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार माजवलेला आहे . या ब्रेक द चैन मोहिमे अंतर्गत राज्य सरकारने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी काही कडक निर्बंध घातले आहेत . त्यासाठी व्यापारी नागरिक या सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे . कोरोनाला हद्दपार करण्यासाठी राज्यातील तेसच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी एकजुटीने लढा देण्याची आवश्यकता आहे . ब्रेक द चैन या मोहिमेतील कडक निबंधाच्या आड काही प्रवृत्ती माथी भडकवण्याचे काम करत आहेत .

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अहोरात्र कोरोनाला हद्दपार करण्यासाठी झटत आहेत. अतिशय वेगाने रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असताना कडक नियमांचे पालन करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे . शहरातील नागरिकांच्या जीविताला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे .

अशा परिस्थितीमध्ये माथी भडकवणा – यांनी सामाजिक बांधिलकीची जोपासना करुन राज्य सरकार तसेच प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे . कोरोनाला हरविण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी एकविचाराने ही लढाई लढणे गरजेचे आहे . यासाठी सर्व व्यापा – यांनी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आम्ही नम आव्हान प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.