मुंबई : विकएंड आणि ख्रिसमसची सुट्टी असल्याने अनेक लोक पर्यटनासाठी बाहेर पडले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्सप्रेस वेवर 28 डिसेंबरला दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे.
बोरघाटात पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. आडोशी बोगदा ते खंडाळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. ख्रिसमस आणि विकएंड या पार्श्वभूमवीर पर्यटक मोठ्या प्रमाणावर फिरण्यासाठी बाहेर पडल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते सकाळी 10 पर्य़ंत वाहतूक कोंडी दिसून येत होती.
अमृतांजन पुलापासून 2 ते 3 किमी च्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, विकेंड आणि ख्रिसमस यामुळे शुक्रवार सायंकाळपासूनच एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अनेकजण ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्याला तसेच आपल्या गावी जायला निघाले आहेत.