यूट्यूबवर ‘कुली नंबर-१’ सिनेमाच्या ट्रेलरची धमाल!

0

मुंबई ः ‘कुली नंबर १’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे. या सिनेमातील सारा अली खान आणि वरूण धवन एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसत आहेत. डान्स, रोमान्स, मस्ती काॅमेडी आणि एक्शन यांचा धमाका या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सारा अली खान आणि  वरुण धवन यांच्या सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धमाल केलेली आहे. कुली नंबर १ या सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबच्या टाॅप ट्रेंडमध्ये आहे. या सिनेमात वरुण धवन गोविंदा आणि मिथून चक्रवर्ती यांच्या यांच्या डायलाॅगची नक्कल करताना दिसत आहे.

एकंदरीत, हा सिनेमा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. हा ट्रेलर पाहणाऱ्यांची संख्या २ लाखांवर गेली आहे. हा सिनेमा २५ डिसेंबरला अमेझाॅन प्राईमवर रिलीज होणार आहे.वरुण धवन, सारा अली खान, परेश रावल, जावेद जाफरी, जाॅनी लीवर, राजपाल यादव हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.