पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत नेमणूक करण्यात आल्या आहेत. राज्यातीलपोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती झाल्यानंतर शहरात आलेल्या सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूकविभागासाठी दोन सहाय्यक आयुक्त देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि. 3) रात्री पोलीस आयुक्तांनी दिले.
सहाय्यक पोलीस आयुक्त भास्कर डेरे यांच्याकडे प्रशासन विभागाची जबाबदारी होती. त्यांची नेमणूक वाहतूक शाखेत करण्यात आलीआहे. त्यांच्यासोबत पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांची देखील वाहतूक शाखेत नेमणूक करण्यात आलीआहे. तर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग येथे नेमणूक झालीआहे.
पदोन्नती झाल्यानंतर नव्याने शहरात दाखल झालेले मुकुट लाल पाटील यांच्याकडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन या पदाचीजबाबदारी देण्यात आली आहे तर सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे भोसरी एमआयडीसी विभागाचीजबाबदारी देण्यात आली आहे.