सात पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आल्याआहेत.

पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांची बदली गुन्हे शाखा युनिट चार येथे, वाकडचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांची बदलीतळेगाव दाभाडे येथे, तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवदवाड यांची बदली वाकड पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.

बावधन वाहतूक विभागाचे निरीक्षक राम राजमाने यांची बदली वरिष्ठ निरीक्षक पिंपरी येथे, वाकडचे निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटीलयांची बदली गुन्हे शाखा एक येथे, चाकणचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे यांची बदली पिंपरी पोलीस ठाणे (गुन्हे) येथे तरमहाळुंगे पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांची बदली तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.