हैदराबाद ः हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत टीआरएसने सर्वाधिक मते मिळविण्याचा मान मिळविला आहे. तर, भाजपा विरोधी बाकावरचा प्रमुख पक्ष म्हणून भाजपाला मान मिळाला आहे. तसेच एमआयएम तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. १४९ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, कोर्टा आदेशाचे पालन करत निरमेड वाॅर्डातील मतमोजणी थांबविण्यात आली.
हैदराबाद महापालिकेचा निवडणुकीतील १५० वाॅर्ड्समधील १४९ जांगाचे निकाल लागलेले आहेत. त्यात टीआरएसला ५५ जागा, भाजपाला ४८ तर, एमआयएमला ४४ आणि काॅंग्रेसला फक्त दोन जागा मिळालेल्या आहेत. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले होते. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एमआयएम आणि टीआरएस या तूल्यबळ पक्षांसमोर शड्डू ठोकून केंद्रातल्या भाजपाने उडी घेतली होती. त्यामुळे तिरंगी लढतीत विजय कोणाचा? याकडे लक्ष सर्वांचे लागून होते. या निवडणुकांमध्ये ५५ जागांवर विजय मिळवत टीआरएसने सर्वाधिक मतांचा पक्ष म्हणून विजयाची मान मिळविला आहे. तर, भाजपाने हैदराबादमध्ये बस्तान बसवत २०२३ च्या निवडणुकीत भाजपा विजय होणार असल्याची आशा व्यक्त केली आहे.
असे असले तरी, एमआयएमसाठी मोठा धक्का आहे. कारण, हैदराबाद हा असदुद्दीन ओवसीचा बालेकिल्ला मानला जातो. आणि तिथेच त्याला तिसरे स्थान मिळालेले असल्यामुळे एमआयएमच्या पदरात निराशा पडली आहे. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांचा दिवस खास आहे. १५० वाॅर्ड्ससाठी ११२२ निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचे खास वैशिष्ट्य हे की, या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत केंद्रातील भाजपाने उडी घेतलेली होती. असदुद्दीन ओवेसी, चंद्रशेखर राव आणि भाजपा यांची तिरंगी लढत सुरू आहे. ३० ठिकाणी मतमोजणी केंद्रांची स्थापना केली आहे. प्रत्येक सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मागील वेळी टीआरएसने महापालिकेवर आपली सत्ता स्थापन केलेली होती.