तृप्ती देसाई अन् ब्राह्मण महासंघ आमने-सामने येणार

भूमाता बिग्रेडचे कार्यकर्ते शिर्डीकडे रवाना

0

पुणे ः “शिर्डी येथील मंदिराच्या आवारात महिलांच्या वेशभूषेसंदर्भात जो बोर्ड लावण्यात आला आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही तिथं जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड त्वरीत हलावाव अन्यथा आणखी तीव्र लढा उभारणार”, असा इशाराच भूमाता बिग्रडेच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानाला दिला आहे.

शिर्डी संस्थानाला दिलेल्या इशाऱ्यानुसार तृप्ती देसाई या पुण्याहून शिर्डीला रवाना झालेल्या आहेत. तृप्ती देसाई शिर्डीत येणार म्हणून शिर्डीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत तृप्ती देसाई येणार असल्याने ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते शिर्डीत पोहोचले आहेत. त्यांना आम्ही सिमेवरच रोखू असा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघ आणि भूमाता बिग्रेड आमने सामने होण्याची शक्यता आहे.

असं आहे प्रकरण…

संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या नेतृत्वातून हा निर्णय घेण्यात आला आहे आणि अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. इतर मंदिरांप्रमाणे शिर्डी देवस्थानाने कपड्यासंबंधीसाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी भक्तांकडून होत होती. त्यांच्या विनंतीचा विचार करुन संस्थानाने हा निर्णय घेतला आहे. शिर्डी देवस्थान परिसरात लावलेल्या फलकांवर, ”साई भक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधाव करावी”, असे लिहिण्यात आलेले आहे. हे फलक हिंदी, मराठी आणि इंग्रजी अक्षरांमध्ये लिहिलेले आहे. याच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी संस्थानाला बोर्ड काढण्याचा इशारा दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.