शिर्डीतील तो फलक संस्थानने न काढल्यास आपण स्वतः दहा डिसेंबरला १० डिसेंबरला शिर्डीत येऊन तो बोर्ड काढू असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यानंतर राजकारण पेटले होते.
पुण्यातील ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने तृप्ती देसाईंना तोडीसतोड उत्तर देणार असल्याचा इशारा दिला होता. तर शिर्डीतील शिवसेना महिला आघाडीने देसाईंनी शिर्डी शहरात प्रवेश केल्यास तोंडाला काळे फासू, असा इशारा दिला होता.
दरम्यान, शिर्डी साईबाबा देवस्थानच्या वतीने हा फलक अनेक दिवसांपासून मंदिर परिसरात असून त्याला आतापर्यंत एकाही साईभक्तांनी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे हा फलक काढण्याचा प्रश्नच येत नसल्याचे संस्थानने पोलिस विभागाला कळवले आहे.
त्यामुळे तृप्ती देसाई हा बोर्ड काढण्यासाठी शिर्डी येथे आल्या तर धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी शिर्डी नगरपंचायतीच्या हद्दीत ८ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत प्रवेश करू नयेत, असे आदेश शिर्डीच्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले आहेत.