गुटखा वाहतूक करणा-‍या दोघांना अटक

१४ लाखांचा गुटखा-जप्त

0

पुणे : गुटख्याची वाहतूक करणा-‍या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १४ लाख २५ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि पिकअप असा एकूण २० लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

धनंजय राजेंद्र गावडे (वय २८, रा. शिवाजीनगर) आणि सुरेश बच्चा मुखिया (वय ३३, रा. मारूंजी, हिंजवडी, मूळ रा. बिहार) असे अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चौघांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी खराडी बायपास चौक ते आठ मुळा रोड खडकी या दरम्यान, आरोपी वाहनचालक धनंजय गावडे आणि  सुरेश मुखिया हे दोघे पोलिसांना बोलेरो पिकअप वाहनात गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुटखा जप्त करून दोघांना अटक केली.

 

आरोपींनी आणखी गुटख्याचा साठा करून ठेवला आहे का? याबाबत तपास करणे, माल कोठून आणला यासह त्यांच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार दोघांना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस उप निरीक्षक एस. ए. जाधव या गुन्हाचा तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.