तीन लाखांच्या गांजासह दोघांना अटक

0

पिंपरी : गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी तीन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवमहाराष्ट्र शाळेच्या पाठीमागे, पिंपरी येथे रविवारी (दि.27) ही कारवाई करण्यात आली.

गौतम किसन गायकवाड (47, रा. नवमहाराष्ट्र शाळेच्या पाठीमागे, पिंपरी) आणि दिपक उर्फ दिपेश इंद्रेकर (24, रा. भाटनगर, पिंपरी) असे गांजा बाळगल्याप्रकरणी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच, रेखा पोपटसिंग तामचीकर (38, रा. भाटनगर, पिंपरी) या महिलेविरोधात एन.डी.पी.एस अॅक्ट अंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेखा आणि दिपेश या दोघांनी आरोपी गौतम याला विक्रीसाठी गांजा उपलब्ध करून दिला. सामाजिक सुरक्षा विभागाने याठिकाणी छापा मारून दोघांना अटक केली.

पोलिसांनी रोख 6 हजार रूपये, 2 लाख 83 हजार 750 रूपये किंमतीचा गांजा, 2,330 स्टॅपलर, दोन हजार रूपयांचा वजन काटा, सहा हजार रूपयांचा मोबाईल. असा एकूण 3 लाख 01 हजार 080 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.