भिशीच्या बहाण्याने दोन कोटी चार लाखांची फसवणूक

0
पिंपरी : भिशीच्या बहाण्याने तिघांनी मिळून 65 जणांची दोन कोटी चार लाख 24 हजार 110 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2019 ते 28 जून 2021 या कालावधीत सज्जनगड कॉलनी रहाटणी येथे घडला.
परशुराम सातपुते ( 50), सागर सातपुते (38), महिला आरोपी (45, सर्व रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत महेश बाबुराव घाटे (37, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वेळोवेळी उचल भिशी लावण्याच्या बहाण्याने फिर्यादी घाटे आणि इतर 64 जणांकडून विश्वास संपादन करून दोन कोटी चार लाख 24 हजार 110 रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपी घर सोडून पळून गेले. 65 जणांकडून घेतलेल्या कोट्यावधी रुपयांचा अपहार करून आरोपींनी फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.