याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत कदम म्हणाले की, रात्री १२.३० च्या सुमारात ड्रीम्स मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग लागली, लेव्हल ३-४ ची ही आग असल्यानं २३ अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचले, या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर रेस्क्यू ऑपरेशनमधून आतापर्यंत ७६ रुग्णांना कोविड सेंटरला हलवण्यात आलं आहे.
आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी पेडणेकर यांनी सांगितलं की, मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये हॉस्पिटल असल्याचं पाहत आहे, या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल. सध्या या हॉस्पिटलमधील ७० पेक्षा अधिक रुग्ण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत अशी माहिती महापौरांनी दिली.