अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0

पिंपरी : अफूच्या सुकवलेल्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 18) दुपारी रहाटणी चौक येथे करण्यात आली.

सावळारा बिरदाराम बिष्णोई (२८, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. राजस्थान), बाबूराम ढोकळाराम बिष्णोई (45, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. राजस्थान), सुरेश (मूळ रा. जोधपूर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉपी स्ट्रॉ विक्री सुरु असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रहाटणी चौक येथे कारवाई करून सावळाराम आणि बाबूराम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता सावळाराम याच्याकडे मोबाईल फोन, दुचाकी आणि 14 हजार 220 रुपयांचा पॉपी स्ट्रॉ मिळून आला. बाबूराम याच्याकडे 47 हजार 250 रुपयांचा पॉपी स्ट्रॉ, 32 हजार 800 रुपयांचा अफिम आणि मोबाईल फोन आढळून आला. हा माल आरोपींनी सुरेश यांच्याकडून राजस्थान येथून आणला असल्याचे आरोपींनी सांगितले.

 

सदर कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ.काका साहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट मार्गदर्शनखाली  अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश पवार, प्रशांत महाले, पोलिस आंमालदार बाळा साहेब सुर्यवंशी, प्रदीप शेलार, संदीप पाटील, मयूर वाडकर, प्रसाद कलाटे, प्रसाद जंगीलवड, संतोष भालेराव, अनिता यादव, पांडुरंग फुंदे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.