पुणे : मंगळवारी सायंकाळी पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जीवाश्यकंठस्य मैत्रिणीअसलेल्या 19 वर्षाच्या दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केली.एकीने राहत्या घरात गळफास घेतला तर एकीने इमारतीच्यापाचव्या मजल्यावर उडी मारली.हडपसरजवळील शेवाळवाडी गावात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
आकांक्षा औदुंबर गायकवाड आणि सानिका हरिश्चंद्र भागवत अशी आत्महत्या केलेल्या या दोन्हीही मैत्रिणींची नावे आहेत. दोघेही 19 वर्षाच्या आहेत.शेवाळवाडी गावातील अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीत हा प्रकार घडला.दोघींनीही एकाच वेळी अशा प्रकारेआत्महत्या केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, आकांक्षा आणि सानिका दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या.सायंकाळी सातच्यासुमारास सानिका हिने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
सानिकाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना आकांक्षाने पाहिले आणि तिने पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडीमारली. ती देखील रुग्णवाहिकेजवळच येऊन पडली. यामध्ये गंभीररीत्या जखमी झाल्याने तिचा देखील मृत्यू झाला. या दोघींच्याआत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.