पुणे : मारणे टोळीतील दोन सदस्यांना गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने फिल्मी स्टाईल जेरबंद केले. बोपदेव घाटात लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीला व त्याच्या मैत्रिणीला दगडाचा धाक दाखवून मारणे टोळीने लूटले होते. यातील अभिषेक व मारणे व अक्षय सावले हे गुन्हा घडल्यापासून मागील दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देत होते. ते मुळशी येथील एका पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची खबर मिळताच सापळा रचण्यात आला होता.
पोलिसांना तेथे दोघे संशयास्पदरित्या फिरताना दिसले. मात्र त्यांची खात्री होत नव्हती म्हणून पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी त्यास “काय अभिषेक’ असा आवाज दिला. यामुळे गांगरुण आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पाठलाग करुन थोड्याच अंतरावर पकडण्यात आले.
अभिषेक ऊर्फ नन्या उदय मारणे (21 वर्षे रा. मारुती मंदीराजवळ मुं पो माळेगाव ता. मुळशी ) व अक्षय अशोक सावले (22 रा. गणेश मंदीराजवळ मु. पो. खामबोली ता.मुळशी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक 29 ऑगस्ट 2019 रोजी महंमद वसीम महंमद सलीम कुरेशी (रा. कोळसा गल्ली कॅम्प)हे त्यांच्या मित्रासमवेत बोपदेव घाटात आल्यावर त्यांना बाथरुम आल्याने त्यांनी गाडी बाजुला लावुन थांबले होते. यावेळी संकेत मारणे, सुरज जाधव, राम गायकवाड व इतर 5 ते 6 अनोळखी इसमांनी कुरेशी यांना शिवीगाळ करुन व त्याचेसोबत असलेल्या मैत्रिणीला दगडचा धाक दाखवला.
यानंतर त्यांचे हातातील दोन सोन्याचा अंगठया व मित्र अवेज खान यांचे गळयातील सोन्याची चैन जबदरदस्तीने धाक दाखवुन चोरली. त्यांना हाताने व लाथाबुक्याने मारहान करुन जबर जखमी केले होते.याप्रकरणात इतर आरोपींना अटक करण्यात आले होते. मात्र त्यांनतर अभिषेक मारणे व अक्षय सावले पोलीसांना गुगांरा देत होते.