माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळावा1993-2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील पुणे व परिसरातील माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील पुणे व पुणे परिसरातील स्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांचाDBAA – या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्नेहमिलन मेळावा हॉटेल लि पार्क हिंजवडी, पुणे येथे 10 जून 2023 रोजी पार पडला. या मेळाव्यात 130 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी DBATU च्या प्राध्यापक वृंद वर्ग ही आवर्जून उपस्थितहोता.
संतोष इंगोले (जॉइन्ट डायरेक्टर DGAQA, रक्षा मंत्रालय, भारत सरकार), संदीप बुधिया(संशोधक F, DRDO, भारतसरकार), प्रवीणस्वामी(API, म पो), श्री नीतीश पाठोडे(Deputy Commissioner, Custom, Ch. Shivaji Maharaj International Airport, Mumbai), मयुर बनसोडे (नायब तहसीलदार, महाराष्ट्र सरकार) व भाजपा महामंत्री विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती वमार्गदर्शन लाभले .
माजी विद्यार्थी जे ओद्योगिक, सामाजिक ,राजकीय ,शैक्षणीक अशा अनेक क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वप्नील,शुभम,ललिता,विशाल,सुरज यांनी प्रयत्न केले.
जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ,नोकरी साठी मदत ,विविधशैक्षणिक शिबिर आयोजित करू अशी ग्वाही दिली.