दोघांकडून दोन पिस्टल, चार काडतुसे जप्त

0

पिंपरी : खंडणी विरोधी पथकाने काळेवाडी येथे दोघांना अटक करुन त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

मयूर अनिल घोलप (27, रा. चिंचवडगाव), विकी अनिल घोलप (23, रा. चिंचवडगाव) अशी खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता काळेवाडी, पवनानगर येथे ज्योतिबागार्डन जवळ पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसानी सापळा लावून दोघा भावांना अटक केली. त्यातील मयूर यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तर आरोपी विकी यांच्याकडून एक पिस्टल आणि एक काडतूस जप्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.