उदयनराजेंचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे ‘अश्रू’

0

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या वक्तव्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांची भूमिका पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाहीत. या घटनेनंतर संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहीले, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू म्हणजे, ते महाराष्ट्राचे अश्रू. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात हीच भावना आहे, की शिवरायांचा हा अपमान सहन करण्यापेक्षा मरण का नाही आलं? त्यांनी ही भावना म्हणजे, महाराष्ट्राची भावना आहे. पण मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे अत्यंत हतबल होऊन त्यांचा अपमान पाहत आहे आणि याउपर शिवप्रताप दिन साजरा करत आहे, हा सर्व ढोंगीपणा आहे.”

तत्पूर्वी, पुण्यातील पत्रकार परिषदेदरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर झाले होते. “जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करता येत नसेल, तर आपण शिवाजी महाराजांचे नाव पुसून टाकू. हे बेगडी प्रेम कशाला हवे? शिवाजी महाराजांचे पुतळे, शिवजयंती, शिवप्रताप दिन कशाला हवेत?
हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं,” असे ते म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.