उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही

0

मुंबई : येणाऱ्या काळात आपण सर्व आश्चर्य चकित व्हाल एवढे पक्षप्रवेश भाजपामध्ये होईल. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना केला.

शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी 25 ते 30 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गुरूवारी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. विभागीय भाजपा कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

लवकरच संपूर्ण अमरावती लोकसभा, तिवसा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते औपचारिक कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश घेणार आहे. या शिवाय शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे असे बावनकुळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे गटाकडचे काही कार्यकर्ते शिंदे गटात आणि काही भाजपमध्ये येत आहेत. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील. येणाऱ्या काळात भाजपामध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होणार आहे. पुढच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीकडेही विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही, अशी दर्पोक्ती बावनकुळे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.