”शेतकऱ्यांना समजून घ्या नाहीतर, रक्तरंजित इतिहासाची…”

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांना दिला इशारा वजा सल्ला

0

कोल्हापूर : ”पंजाबमध्ये गेली ४ दशके शेतकरी चळवळ सुरू आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ही चळवळ नीट समजून न घेता आल्यामुळे शेतकऱ्यांची पोरं असामाजिक तत्वांच्या आहारी गेली. त्यामुळे देशाला तत्कालीन पंतप्रधानांना गमविण्याची वेळ आहे. आताही पंजाबी शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू असताना मागील इतिहासाची रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, स्टॅलिनप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या रक्ताने स्वतःचे हात रंगू नयेत”, असा सल्ला राजू शेट्टी यांनी दिला आहे.

कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. रावसाहेब दानवेंवर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले की, मी हाडाचा शेतकरी आहे. कागदावरचा नाही. असे बोलणे केंद्रीय मंत्री असलेल्या दानवेंना शोभत नाही. दानवे यांना चीनमधून धमकी आली असावी म्हणूनच ते पत्रकार परिषदेतून उठून गेले असावेत, असा मिश्किल टोमणा त्यांनी मारला.
फडणवीसांवर टीका करताना शेट्टी म्हणाले की, ”कोणत्याही भ्रष्टाचाराचे समर्थन अजिबात केले जाणार नाही. राज्य सरकारत्या भ्रष्टाचाराविषयी देवेंद्र फडणवीस यांनी जरुर काढावे. पण गाडीभर पुरावे काढताना ती गाडीच गायब होऊ नये याची काळजी घ्या, असा टोला शेट्टी यांनी लगावला.
Leave A Reply

Your email address will not be published.