अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबईत अटक

0

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीनं (NCB) मुंबईत अटक केली आहे. दाऊदच्या भावावर ही कारवाई करत एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

एनसीबीला यापुर्वी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मिळालेले आहेत.

प्रकरणात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा हात असल्याची कुणकुण तपास यंत्रणांना लागली होती. चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशीअंती इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याची कोठडीत रवानगी करावी म्हणून न्यायालयात मागणी देखील करण्यात येणार आहे.

एनसीबीनं गेल्या काही महिन्यांपासुन मुंबई आणि परिसरात मोठया कारवाया करण्यास सुरवात केली आहे. कोटयावधी रूपयांचे अंमली पदार्थ देखील एनसीबीनं आतापर्यंत जप्त केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.