विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश उपलब्ध करून द्यावेत – आमदार अण्णा बनसोडे

“आमदार निधीतून डिजिटल वर्ग खोल्यांसाठी ३६ लक्ष निधी”

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपा शाळा सुरु होऊन जवळपास ३ महिने झालेले आहेत. २०१९-२०, २०२०-२१ या वर्षात कोविडचा प्रदुर्भाव व लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या २०२१-२२ मध्ये शेवटीचे सहा महिने शाळा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या, लॉकडाऊन व कोविड काळात विद्यार्थी शाळेत येऊ शकले नाहीत. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी शाळेत आले परंतु विद्यार्थ्यांना मनपाने गणवेश तसेत इतर शैक्षणिक साहित्य वाटप केले नाही.

जून २०२२ पासून सर्व मनपा शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा सुरु होऊन खूप कालावधी उलटून गेला, तरी मनपा प्रशासनाच्या अनस्थेमुळे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. याला सर्वस्व प्रशासन जबाबदार आहे. गणवेश निविदा काढून द्यायचे की गणवेश खरेदीचे अधिकार शाळा मुख्याधापाकांना द्यायचे या घोळत वेळ निघून चालला आहे आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

गणपती उत्सव ३१ तारखेपासून सुरु होत आहे. गणपती विसर्जनापूर्वी जर प्रशासनाने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले नाही तर मात्र हा विषय गांभीर्याने घेतला जाईल व मनपा प्रशासनाची तक्रार मंत्रालयात करण्यात येईल असे मत आमदार बनसोडे यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या १०५ शाळांमधून ४३००० विद्यार्थी तर १८ माध्यमिक शाळा व ४ भाग शाळांमध्ये ८००० विद्यार्थी असे एकूण ५६००० विद्यार्थी मनपा शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

अनेक शाळांच्या इमारती खूप जुन्या व जीर्ण झालेल्या आहेत. या शाळांमधून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सर्व वर्ग खोल्या डिजिटल केल्या आहेत. या डिजिटल वर्ग खोल्यांमध्ये इंटरनेट सुविधा फक्त नावापुरती दिलेली आहे.

माझ्या स्वीय सहाय्यकाने काही शाळामंध्ये भेटी दिलेल्या आहेत. भेटी दिलेल्या शाळांमध्ये डिजिटल वर्ग खोल्यांमध्ये शिक्षक स्वतः मोबाईलच्या Hotspot द्वारे इंटरनेट जोडणी करून विद्यार्थ्याना शिक्षण देताना दिसले. अधिक चौकशी केली असता केवळ वायरिंग केले आहे. इंटरनेट उपलब्ध नसल्याचे कारण शिक्षकांनी दिले.

याबाबत मी प्रत्यक्ष भेटी देणार असुन खरा प्रकार काय आहे याची माहिती घेणार असल्याचे आमदार बनसोडे यांनी सांगितले. मनपा शाळा डिजिटल वर्ग खोल्यांमध्ये वापरलेले मटेरिअल अत्यंत निकृष्ट व चाईना मेड असुन मनपाची फसवणूक करून निकृष्ट दर्जाचे मटेरीअल दिले किंवा कसे या बाबत खात्री करणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

पुढे बोलताना बनसोडे म्हणाले माझ्या स्थानिक विकास निधीमधून १२ वर्ग खोल्या डिजिटल केल्या असुन यासाठी केवळ ३६ लक्ष निधी खर्च झाला असुन काम पूर्ण झाले आहे. त्याचा शुभारंभ पुढील आठवड्यात करण्यात येईल.

मनपा काही शाळांमधून CBSC पॅटर्नच्या शाळा सुरु करण्यासाठी पुढील आठवड्यात नवीन आयुक्तांची भेट घेऊन शहरातील मनपा शाळेचा शैक्षणिक दर्जावाढ होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.